राज्यशैक्षणिक

प्रतीक्षा संपली, आज जाहीर होणार बारावीचा निकाल!!

दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे

📚 प्रतीक्षा संपली, आज  जाहीर होणार बारावीचा निकाल!!

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

💁‍♂️ राज्यातील बारावीचा निकाल आज म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता 👉 https://www.mahahsscboard.in–  या विशेष पोर्टलवर ऑनलाईन जाहीर होणार आहे.

📚 याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.

📖 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.

👦2025 च्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

📌 दरम्यान, दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close