राज्यशैक्षणिक

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! 

परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! 

वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी मागविले निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन; यंदा 10 दिवस अगोदर परीक्षा

यंदा इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीपेक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे. पण पुणे बोर्डाने निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो. यासंदर्भात बोर्डाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे.

यंदा इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीपेक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे. पण, पुणे बोर्डाने निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो. यासंदर्भात बोर्डाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असून तेथून परवानगी मिळाल्यावर काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, अन्यथा निवडणुकीनंतरच ते जाहीर केले जाईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता फक्त दहा दिवस अलीकडे होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आचारसंहितेत प्रसिद्ध करता येईल का, यावर मार्गदर्शन घेतले जात आहे. आचारसंहितेचा काही अडथळा नसल्यास काही दिवसांत ते जाहीर होईल. दुसरीकडे परीक्षा दहा दिवस अलीकडे घेतल्याचे राजकीय भांडवल होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. कारण, १० ते २० पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीतील निर्णय घेतल्यावर असाच प्रकार झाला होता. त्यामुळे बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले आहेत.

परीक्षेचे असे आहे वेळापत्रक

इयत्ता बारावी

प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

————————————————————

इयत्ता दहावी

प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत

लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च

परीक्षा १० दिवस अगोदर का?

परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल

परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो

पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close