सामाजिक

देशभक्ती हीच ईश्वर सेवा”हवलदार मुकेश गावंडे”

देशभक्ती हीच ईश्वर सेवा”हवलदार मुकेश गावंडे”

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था

(आव्हाना)-सिल्लोड तालुक्यातील आव्हाना गावातील सुपुत्र हवलदार श्री मुकेश जगन्नाथ गावंडे हे भारतीय सेनेतून २४ वर्ष सेवाकाळ् पूर्ण करून बावीस मराठा लाईट इनफ्रंटि बटालियन मधून सेवानिव्रूत होऊन मायदेशी परतलेत
आव्हाना गावातील ग्रामपंचायत व परिसरातीत नागरिकांच्या वतीने त्यांच्या आगमनाप्रितर्थ सोमवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्यदिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सत्कार सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना श्री मुकेश गावंडे म्हनालेत की मी खूप नशीबवान आहे की मला २४ वर्ष माझ्या भारत मातेची सेवा करायची संधी मिळाली देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे खूप कमी लोकांच्या नशिबात देशसेवा करण्याची संधी असते मी नशीबवान आहे की फुल ना फूलाची पाकळी का होईना ज्या भारत देशात मी जल्माला आलो त्या मायभूमीच्या मात्रूभुमीची मी मनोभावे सेवा करू शकलो तिरंगाला सर्वस्व समर्पित व अर्पण करून मी प्रामाणिकपणे मनोभावे देशाच्या कामी आलो याचा मला अभिमान व गर्व वाटतो.

आजच्या तरुणांनी वकील डॉक्टर इंजीनियर होण्यापेक्षा संरक्षण खात्यात भरती होऊन आपल्या भारत मातेचे संरक्षण करावे .असे प्रतिपादन हवालदार मुकेश गावंडे यांनी केले व गांव व परिसरातीत नागरिकांनी सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सोसायटी बचत गट सरकारी व निमसरकारी कर्मचारी परिसरातील नागरिक तसेच पत्नी सुरेखा गावंडे .मुलगी दीदी गावंडे मुलगा आदित्य गावंडे इत्यादि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close