सामाजिक

14 एप्रिल राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

साक्षर इंडिया लाईव्ह आयोजित ऑनलाईन वकृत्व स्पर्धा

🥇🥈🥉🥇🎖️ 14 एप्रिल🎙️ राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 🎙️

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

✨ स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताला उभारणी देण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि कार्य अत्यंत मौलिक ठरले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्व उत्साहात साजरी करतो. यानिमित्त त्यांच्या विचारांना जनमानसात पोहोचविण्यासाठी व संविधानाच्या जनजागृतीसाठी तुमचं वक्तृत्व आणि विचार आपल्या  हक्काच्या व्यासपीठावर व्यक्त करा आणि प्रसिद्धी मिळवा…✨ 

       📚 स्पर्धेचे विषय📚

1. भारतीय संविधान : मुलभूत हक्कांसोबत कर्तव्यांची जवाबदारी

2. सामाजिक समरसता : सर्वांगीण विकासाची संजीवनी

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक विचारांचा झंजावात

4. अभिव्यक्ती स्वातंत्र्य : प्राणवायू इतकेच महत्वाचे 

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत 

 सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित

📋 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी. 

1. स्पर्धेत 15 वर्षांपुढील कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकतो.

2. कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

3. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर व्हिडिओ 5 ते 7 मिनिटांपर्यंत असावा.

4. व्हिडिओ बनवतांना चांगल्या व स्थिर कॅमेराचा वापर करावा.

5. सुस्पष्ठता. प्रकाश, आवाज ई. गोष्टींची काळजी घ्यावी.

6. स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 8888962010 या क्रमांकावर WhatsApp करावा.

7. वाचन करून केलेला व्हिडीओ विचारात घेतला जाणार नाही.

8. व्हिडिओ सोबत संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, संपर्कासाठी मो.क्र. ई-मेल, जन्म दिनांक, ई. तपशील द्यावा.. 

9. व्हिडीओ पाठविण्याची अंतिम मुदत 14 एप्रिल 2025, दुपारी. 2 वाजेपर्यंत.

10. WhatsApp वर माहिती पाठवून नावनोंदणी करणे आवश्यक.

 📊 गुणदान पद्धती 

स्पर्धा एकूण 100 गुणांची असेल.

निवडक व्हिडीओंना प्रसिद्धी दिली जाईल.

50 गुण स्पर्धकाच्या व्हिडिओतील आशय आणि सादरीकरणासाठी दिले जातील.

तसेच निवडक स्पर्धकाचा व्हिडिओ Sakshar India Live News या चँनेलवर वर प्रकाशित करण्यात येईल. स्पर्धकाच्या व्हिडिओवर मिळालेल्या कमेंट्स, लाईक्स, आणि

व्हीव्स च्या आधारे 50 गुण दिले जातील. आधी येणाऱ्या व्हिडीओंना आधी प्रसिद्धी देण्यात येईल.

 सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येतील.

स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

स्पर्धेचा निकाल Sakshar India Live या चँनेल वर प्रकाशित करण्यात येईल.

https://saksharindialivenews.in

———————————-

  नावनोंदणी साठी आवश्यक माहिती ( मोबाईल नंबर व्यतिरिक्त सर्व माहिती फक्त मराठी मध्ये खालील क्रमाने लिहावी व याच 8888962010 या क्रमांकावर पाठवावी ) 

संपूर्ण नाव :

पत्ता :

तालुका :

जिल्हा :

जन्मतारीख:

निवडलेल्या विषयाचे नाव :

विद्यार्थी असल्यास शाळेचे नाव :

मोबाईल नं :

फोटो : 3 सुस्पष्ट (HD) फोटो. फोटो कोणत्याही बाजूने कट नसावा.

📌विशेष सूचना- व्हिडीओ चांगल्या प्रकाशात व सुस्पष्ट आवाजातला असावा. शक्यतो चांगल्या मोबाईल कॅमेराचा वापर करावा. निवडक व्हिडीओंना प्रसिद्धी दिली जाईल त्यामुळे दर्जेदार आशयावरसुद्धा भर द्यावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close