राज्यशैक्षणिक

1 ली ते 9 वीची सत्र परीक्षा 20 एप्रिलपासून

परीक्षांचा निकाल 1 मे रोजी जाहीर होऊन 2 मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असेल

1 ली ते 9 वीची सत्र परीक्षा 20 एप्रिलपासून

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता 1 ली 9 वीच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांची तारीख 20 एप्रिलपासून ठरवण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) ने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

इयत्ता 1 ली ते 9 वीच्या परीक्षांचे आयोजन एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. परीक्षांचे आयोजन शाळास्तरावरून करण्यात येईल. परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका शाळांना स्वतंत्रपणे तयार कराव्या लागणार आहेत.

परीक्षांचे आयोजन सकाळी 8 ते 10.30 या वेळेत होणार आहे. शिक्षक त्याच दिवशी संबंधित वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासू शकतात. परीक्षांचा निकाल 1 मे रोजी जाहीर होऊन 2 मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असेल

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close