सामाजिक

५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त एन्ड्युरन्स ग्रुप मध्ये रक्तदान शिबीर

शिबीरात ५१ रक्तदाते यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.

५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त एन्ड्युरन्स ग्रुप मध्ये रक्तदान शिबीर

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

आज ५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि.के २२८/२९ या कारखान्यात मागील १६ वर्षापासून सप्ताहात दररोज विविध सुरक्षाविषयक सामाजिक उपक्रम साजरे करतात या वर्षी प्लांट हेड अविनाश ब्राह्ममेकर, रविंद्र मोहिते,प्लांट एच.आर.एस सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा,चालता बोलता प्रश्न मंजुषा,पथनाट्य,आग नियंत्रण प्रशिक्षण, प्रथमोपचार ट्रेनिंग हे उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार असुन.सप्ताह च्या पहिल्याच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सुरूवात करण्यात आली.रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी,नागेश कुठारे, प्रविण कुमार रणयेवले, योगेश गोरडे,अमिताभ मिश्रा, भास्कर अंभोरे,ललित चौधरी, कैलास चौधरी,धोंडिराम शेळके,अरूण घोगरे,सुनिल जाधव,माधव वाघमारे,वरूणराज वाणी,रोहीत वाघमारे, अरूण घोगरे,यांनी परिश्रम घेतले.रक्त संकलन लायन्स ब्लड बॅक ,छ.संभाजीनगर यांच्या वतिने करण्यात आले असुन या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्यामराव सोनवणे, डाॅ.आश्विनी नरवडे, बाबासाहेब कळमकर यांनी केले असुन या शिबीरात ५१ रक्तदाते यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close