
वाळूजमहानगर परीसरात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी
वाळूज महानगर प्रतिनिधी: राजू जंगले
– वाळूज औद्योगिक परिसरातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.यावेळी छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देशमुख,वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णाकांत शिंदे , एपीआय मनोज शिंदे, राजाभाऊ कोल्हे, योगेश शेळके, विक्रम वाघ, यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या अनूषंगाने विधानसभा -२०२४ निवडणुकीच्या पार्शवभुमीवर रुट मार्च घेण्यात आला.वाळुज महानगरातील प्रताप चौक रांजणगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. सदर रुट मार्च पोलीस स्टेशन येथुन सुरू होऊन प्रताप चौक- राजनगांव फाटा- राजनगांव ग्रामपंचायत- ऐकतानगर-दत्तनगर फाटा- एनआरबी चौक- इंद्रप्रस्थ कॉलनी बजाजनगर- जयभवानी चौक-आम्रपाली बौद्ध विहार- आण्णाभाऊ साठे चौक- वडगाव कोल्हाटी – मोहटा देवी चौक-हायटेक कॉलेज बजाजनगर मार्गे पोलीस स्टेशन असा करण्यात आला.सदर रुटमार्च करीता पोलीस ठाणेचे -१०अधिकारी, ३०अमंलदार, BSF- ३ अधिकारी १२ अमंलदार आदींची उपस्थिती होती.
