राजकिय

मसनतपुर येथील शेकडो युवकांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

युवकांचा अतुल सावे यांच्या कार्यावर विश्वास अधिकच दृढ झाला आहे


मसनतपुर येथील शेकडो युवकांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सुरू आहे यातच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्याकडे तरुणांचा रोग वाढताना दिसून येत आहे 

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना आणि उपक्रम युवकांना सर्वांगीण प्रगतीसाठी लाभदायक ठरत आहेत. आपल्या शहरात बहुराष्ट्रीय कंपन्यांची ५० हजार कोटींची गुंतवणूक आणि त्यामाध्यमातून २५००० रोजगार निर्मिती हे भविष्य आशादायी ठरत आहे. शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रातील प्रगती तसेच पायाभूत सुविधेतील दृश्य बदलांमुळे नव्या भारताचे भविष्य असलेल्या युवकांचा आपल्या कार्यावर विश्वास अधिकच दृढ झाला आहे. त्यामुळेच पक्षाकडे युवकांचा ओघ वाढतोय.

सचिन मिसाळ यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश करण्यात आल्याचे समजते. यावेळी विनोद व्यवहारे, रोहित शिंदे, विश्वजीत नरवडे, कुणाल जगताप, विनोद निकाळजे, विनोद साळुंखे, भगवान सोनवणे, संतोष त्रिभवण, रुद्र वाकोडे, भारत शिंदे, विशाल हिवाळे, विशाल केदारे, विशाल ससाने, विकास घोरपडे, आकाश गायकवाड, शुभम अभंग, सुमित सावंत, अनिल यादव, काकासाहेब काकडे, संदीप शिंदे, गणेश नाबकर, अजय साठे, अजय डोळे, आकाश अभंग, राहुल गायकवाड, राहुल वाणी, परमेश्वर शिंदे, परमेश्वर खरात, गणेश गायकवाड, रवी सूर्यनारायण, संदीप खंडाळे, बाळासाहेब शिंदे, सनी गायकवाड, प्रतीक सोनी, सुनील पटेकर यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्याला खासदार डॉ.भागवत कराड, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष बोराळकर, श्री.सुरेंद्र पाटणी, श्री.अनिल मकरीये, श्री.बाळासाहेब सानप आणि श्री.किशोर शितोळे यांची उपस्थिती आदींची होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close