
… तर जशास तसं उत्तर देऊ!!!
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
नांदेड जिल्ह्यात प्रचारासाठी दौऱ्यावर असताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करण्यात आला. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत. विधानसभा निवडणुकीत मराठा खाणावळीच्या एकजातीय घराणेशाहीला आव्हान देणाऱ्यांना जर अशाप्रकारे हिंसक हल्ले करून रोखण्याचा प्रयत्न होणार असेल तर वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करणार नाही.
सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध आहे.
प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या घराणेशाहीच्या सत्तेला आव्हान निर्माण झाल्यामुळे ते बिथरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या मराठा खानावळ आहेत. या मराठा खानावळीनेच आपल्या हस्तकांच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेवर हल्ला केला आहे. असे हल्ले घडवून राज्यात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडी ही दहशत बिलकुल खपवून घेणार नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज जाहीर करीत आहोत की पुन्हा जर असे भ्याड हल्ले करण्यात आले तर जशास तसं उत्तर देण्यात येईल. हल्ला करणाऱ्यांच्या नेत्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही.योगेश गुलाबराव बन,वंचित बहुजन आघाडी,जिल्हाध्यक्ष – औरंगाबाद पश्चिम.
