संभाजीनगर मध्य मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांनी फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत स्वागत केले.

संभाजीनगर मध्य मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत यातच छ्त्रपती संभाजी नगर यादवनगर, टी.व्ही.सेंटर परिसरात जैस्वाल यांच्या पदयात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, शिवाय सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला आणि त्यावर त्यांनी चर्चा केली. नागरिकांनी आपल्या समस्या माझ्याकडे मांडल्या, त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी अनेक नागरिकांनी आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे वचन दिले. पदयात्रेत महिलांनी औक्षण केले, तर नागरिकांनी फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेला शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आणि शिक्षण या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले.
महायुती सरकारच्या योजनांचा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता व्यक्त केली. पदयात्रेदरम्यान, विशेषत: महिलांनी या पदयात्रेत सक्रिय सहभाग घेतला होता. या पदयात्रेला महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
