जाफ्राबाद येथे युवा संवाद मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोचविण्याचे काम मी केले आहे.

आज जाफ्राबाद येथे मा. केंद्रीय मंत्री माननीय श्री. रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संतोष भाऊ दानवे प्रमुख उपस्थितीत “युवा संवाद मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मागील दहा वर्षांमध्ये मतदार संघामध्ये रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा सोबतच पायाभूत सोयी सुविधा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोचविण्याचे काम मी केले आहे.
गेल्या दहा वर्षात संजय गांधी, श्रावणबाळ योजने अंतर्गत मतदार संघात 57 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिला, कामगार कल्याण मंडळा अंतर्गत 34 हजार कामगाराच्या नोंदी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भोकरदन व जाफ्राबाद या दोन्ही तालुक्यातून 1 लाख 28 हजार माता भगिनींना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला त्यासोबतच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजनांची प्रभावी अमंलबजाणी मतदारसंघामध्ये केली आहे.
आगामी काळात आपल्याला भोकरदन व जाफ्राबाद तालुक्याचा अधिक प्रमाणात व वेगवान गतीने विकास करावयाचा असून त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 2 समोरील ‘कमळ’ या चिन्हाचे बटन दाबून मतदानरुपी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने तरुण बांधवांची उपस्थिती होती.
