
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या ताज्या घडामोडी
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
▪️शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ कुठंही वापरु नका, तुमच्या उमेदवारांना सूचना द्या, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश
▪️उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं वक्तव्य
▪️बाकीच्यांचं वय बघता, बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची
▪️जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मुलींना मद्यधुंद गुंडांनी मारहाण केल्याचा खासदार रवींद्र वायकरांचा आरोप
▪️सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना तर देशमुखांकडून देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, पण मी ते रेकॉर्डवर घेतले नाही, न्या. चांदीवाल यांचा दावा
▪️संजय राठोडांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार
▪️बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी, बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट सापडले
▪️मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’, विधानसभेला स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अगोदरच सांगितल्याचं स्पष्ट केलं
▪️इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवावं, बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
▪️ शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताला कमी लेखले, म्हणाला भारतीयांपेक्षा पाकिस्तानातील लोकांची मोठी मने
