
अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या आमखास मैदानावर जाहीर सभा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर हे उद्या दिनांक 16 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिध्दार्थ भाऊ मोकळे,औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट आदी उपस्थित राहणार आहेत या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला आघाडीच्या अँड लताताई बामणे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर आदींनी केले आहे.
