
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
▪️ माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी ट्विट करून लगावला टोला
▪️ गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना खोचक टोला
▪️ विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग, मनसेचे बाळा नांदगावकरही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
▪️ अजित पवार जर बारामती विधानसभा मतदारसंघातून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी
▪️ निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
▪️ अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या 35 जागा निवडून येतील’, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांचा मोठा दावा
▪️ पैसे वाटपाच्या आरोपावरुन विनोद तावडे संतापले, माफी मागावी अन्यथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांच्यावर 100 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार
▪️ निकालापूर्वी भाजप आमदार दादाराव केचे यांची राजकीय संन्यासाची घोषणा, भाजपमधील असंतोषामुळे राजकीय स्फोट
▪️ 217 धावा अन् तब्बल 17 विकेट! पर्थच्या मैदानावर बड्या फलंदाजांचं पानिपत, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात
