
पुणे येथे सन.2024चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांचा सन्मान
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी राजू जंगले पुणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज विठोबा मोकासे पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांना पुणे येथील जिल्हा परिषद सभागृहात दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मा.महेश पालकर साहेब शिक्षण संचालक पुणे,HWPL च्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.व्हिक्टोरिया मुत्तुम मॅडम तसेच , मा.विलास लोंढे साहेब सहायक आयुक्त (समाज कल्याण)पुणे, मा. काळे पी.एस. साहेब प्रशासन अधिकारी मनपा पुणे यांचे शुभ हस्ते व संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष गायकवाड सर,राज्य सचिव सत्यजीत
जानराव सर,मराठवाडा अध्यक्ष रमेश कांबळे सर माजी सरपंच पीएम डाहाके सर बापूसाहेब छत्रे सुरेश कोल्हे बळीराम मोकासे यांचे व इतर मान्यवरांचे उपस्थित प्रदान करण्यात आला.त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
