महाविकास आघाडीत महाभूकंप… समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क सकाळच्या घडामोडी
▪️विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; शरद पवार हे आज मारकडवाडीत जाणार असल्याची केली महत्वाची घोषणा
▪️विरोधकांना आज संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा कामकाजात सहभागी होता येणार नाही, अजित पवारांची मविआच्या नेत्यांना वॉर्निंग
▪️विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता, आज अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार
▪️भंडारा जिल्ह्यात मोबाईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा मृत्यू, सुरेश संग्रामे असे मयत शिक्षकाचे नाव
▪️महाविकास आघाडीत महाभूकंप… समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
▪️देवेंद्र फडणीस यांच्या सोबत आपली दुष्मनी नव्हती तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणीस सरकार सोबत दिलजमाई करण्याचे दिले संकेत
▪️आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या, शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं
▪️भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खेळताना पाहायला मिळण्याची शक्यता
▪️प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई हे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु
▪️स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी आरक्षण निहाय जागांची सोडत जाहीर, 27 डिसेंबर 2024 पर्यंत करता येणार अर्ज
