
‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था
‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या.
मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता दाट आहे. मात्र यासंदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील.
त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे.
