
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ बीड हत्याकांडप्रकरणात चर्चेतील वाल्मिक कराडवर कारवाई होईलच, पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द
▪️ सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे आहेत, त्यांना कोणतीही मारहाण झालेली नाही,परभणी हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचे 2 मोठे खुलासे
▪️ कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला याचं निलंबन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ सभागृहात मोठी घोषणा
▪️ कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, महाविकास आघाडीच्या खासदारांचं उपोषण, मंत्री पियूष गोयलांना दिलं पत्र
▪️ चाकणवरुन महाडला निघालेल्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात कोसळली, पाच जणांचा मृत्यू, 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी
▪️ शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता
▪️ एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
▪️ मायरा वायकुळ आगामी चित्रपटासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी; ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चे पहिलं पोस्टर लाँच
