राजकियराज्य

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

डॉ. मनमोहन सिंह यांनी एप्रिल 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्ती घेतली

💁‍♀️ डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

😰 देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (26 डिसेंबर) अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

🙏 मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

😔 डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

💥 डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दल थोडक्यात माहिती :

▪️डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता.

▪️ त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होत.

▪️ 1962 साली डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील पदवी संपादन केली होती.

▪️ मनमोहन सिंह यांनी 1966 ते 1969 या काळात संयुक्त राष्ट्रात काम केलं.

▪️ वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली

▪️ भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार 1972 ते 1976 या काळात त्यांनी काम केलं.

▪️ भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1982 ते 1985 या काळात ते गव्हर्नर होते.

▪️ 1985 ते 1987 या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.

▪️ डॉ. मनमोहन सिंह यांची 1991व्या साली अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली.

▪️ त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते.

▪️ 2004 साली डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

▪️ डॉ. मनमोहन सिंह यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं.

▪️ त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी एप्रिल 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close