
बजाजनगरात “दारू नको,दूध प्या ” व्यसनमुक्ती जनजागृती
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज वाळूज महानगर प्रतिनिधी- राजू जंगले
वर्ष अखेर निमित्त तरुणाई मध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असते. त्या पार्ट्यांमध्ये सरांस दारू, भांग, गांजा, मार्फीन,हिरॉईन , मेफड्रोन अशा विविध अमली पदार्थाचा शरीरावर, मानसिक,सामाजिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हे माहीत असताना सुद्धा मित्रांच्या आग्रहाखातर “एक दिन के लेनेसे कुछ नही होता .” सब लेते है असं समजून या दिवशी हिरोच, नटीच एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे बघून व्यसन केलं जातं.
या अमली पदार्थापासून तरुण नागरिकांनी अलिप्त रहावं. 31 डिसेंबर म्हणजे उत्सव नाही, सण नाही ती एक महिन्याची शेवटची तारीख आहे. हे समजण्यासाठी देवळाई चौकातील सहारा व्यसनमुक्ती केंद्र व देवगिरी महानंदा दूध यांच्या संयुक्त विद्यामानाने ” दारु नको, दूध प्या ” हा सामाजिक उपक्रम महाराणा प्रताप चौक बजाज नगर वाळुज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर येथे मोफत 200 लिटर दूध वाटण्यात आले.
ह्या उपक्रमाचे उद्घाटन देवगिरी महानंदाचे अध्यक्ष गोकुळशेठ राजपूत, उपाध्यक्ष दिलीप निरपळ यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, उदय दुधगावकर (AGM )CSR Endurance Tech Ltd, डॉ. रमेश केदार, डॉ. विजय मोरे, डॉ. नरेश निंबाळकर, डॉ. जगदीश टेकाळे, डॉ. व्यंकटेश उबाळे ,डॉ. राहुल सुरवाडे, डॉ. संकपाळ एम.डी, व्यसनमुक्ती प्रचारक प्रदीप माळी , व्यसनमुक्ती प्रचारक संजय काळे, महानंदाचे मार्केटिंग अधिकारी पवन डांगी,घुले,दिलीप पाटील, साकला साहेब, निलेश तेरकर, सरपंच सुनील काळे, मोतीलाल राठोड प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केंद्राचे संचालक सुनील बढे, कारभारी सोनवणे, समूपदेशक. शिल्पा थोरात यांनी मार्गदर्शन केले .
बहुसंख्य कामगार , नागरिक, महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्राचे सोशल वर्कर ऋषिकेश काकर, सागर काळे, संदीप इंगळे, प्रकाश सुरडकर निवृत्ती तांगडे, रोशन पाटील , कांचन कुलकर्णी, सविता येवले , कल्पना गायकवाड यांनी प्रयत्न केले.
