“म्हणे आम्ही “बालिका दिन” व “महिला मुक्ती दिन” साजरा करतो ….!

“म्हणे आम्ही “बालिका दिन” व “महिला मुक्ती दिन” साजरा करतो ….!
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
आज ०३ जानेवारी राष्ट्रमाता क्रांतीज्योती ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो व “या भूतलावरील समस्त महिला मुली बालीकांना “बालिका दिन”व महिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो
…..रात्री एका साहित्यिक कार्यक्रमा निमित्त बाहेर गावी गेल्यामुळे रात्री उशीरा घरी परत आलो म्हणुन आज सकाळी उठायला थोडा उशीरच झाला …उठता उठताच मोबाईल हातात घेतला .मीडियावर “बालिका दिना” च्या शुभेच्छा नी हैदौस घातला होता …..मी आळस देत मोबाईल बाजूला फेकला …सूर्य बराच वरती आला होता शाळेत जायला उशीर होईल म्हणुन झटक्यात हातात ब्रश घेतला .. …ब्रश करता करता खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले ..समोरच्या पटांगणात कोवळे ऊन चमकू लागले होते वातावरण शांतच भासत होतं ….आभाळाला ढगांनी चहूबाजूने घेरुन शाल पांघरल्यागत झाकले होते …
माय क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जल्मदिवस ०३ जानेवारी आम्ही “बालिका दिन” म्हणुन साजरा करतो पण माय सावित्रीने बालिका साठी काय काय कष्ट घेतलेत मुलीसाठी किती भयानक यातना सहन केल्यात हे आम्ही विसरतो की काय असे वाटते माय सावीत्रीने सम्पूर्ण जीवन समाजाचा अमानुष छळ सहन करत बालिका साठी महिलासाठी आपले आयुष्य अर्पण केले
…….आणी आज आम्ही ….!
……..बालिका दिन व महिला मुक्ती दिन …… साजरा करत आहोत .. माझ्याच भारतीयांचा बालिका दिन साजरा करण्याचा पुळ्का उत्साह बघून मला ही जरा नवल वाटलं ..आम्ही आता सुधरलो त की काय असे सहज मनात येऊन गेले ….पण मी लगेच भानावर आलो ..कन्या डे..मदर फादर डे. रोज डे .. डे..डे.. डे.. डे.. डे ..अमका डे तमका डे फलाना डे .रोज कोणता ना कोणता तरी डे आमचा असतोच आणी मग त्या दिवसापुरते आम्ही सज्जन आणी चारित्र्यवान बनून माणसा सारखं …खरंच माणसा सारख..वागुन शुभेच्छा देतो…. मुँह मे राम बगल मे सूरी …..अशी प्रव्रुती समजून एक दिवसापूरता उत्साहित होऊन एखादा डे साजरा केला की झाल मग आम्हांला इतका आनंद होतो की जणू काही आम्ही एखादा पहाड़च कानी केला की काय असे वाटते …..रात गयी तो बात गयी ….या उक्ति प्रमाणे दुसऱ्या दिवशी सारं विसरून आमची हरामी प्रव्रुति जैसे थे ….इतकच नाही आम्ही काल कोणता डे साजरा केला तेही आम्हांला आठवत नाही …..असो ….
…….वर्तमान पत्र हातात पडले किंवा टीव्ही चे चॅनल बदलले की सर्वात जास्त बातम्या माझ्या आया बहिणीवर मुलिंवर होणाऱ्या अत्याचाराच्या असतात ..ब्लॅकमेलींग..छळ ..हुंडा बळी ..मूल होत नाही म्हणून …दिसायला चांगली नाही म्हणून ..चारित्र्यवर संशय घेऊन ..माहेराहून पैसे आणत नाही म्हणून दररोज माझ्या मुलींचा बहिणीचा छळ केला जातो किंवा आत्महत्येस प्रवृत्त केले जाते …याला जबाबदार कोण ..आम्हीच हरामखोर् ….काही दिवसापूर्वी नांदेडच्या आभियांत्रिकी कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थीने मुलाच्या ब्लॅकमेलिगला कंटाळून आत्महत्या केली ही घटना फक्त एक प्रतिनिधिक आहे या जगात दररोज अशा कित्येक घटना घडतात काही आपल्या पर्यंत येतात तर काही येतच नाही ज्या वेळेस आमच्या बहिणीवर व मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा आम्ही कुठे जातो ….आणी अन्याय अत्याचार करणारे आम्हीच असतो ….कुणी आभाळातून एलीयन येत नाहीत जो पर्यंत आम्ही आमची हरामी प्रवृती सोडत नाहीत …आमच्या मुलींचे आणी बहिणीचे पूर्णपणे संरक्षण करत नाहीत आणी जे अन्याय अत्याचार करणारे राक्षस आहेत त्यांना शिक्षा मिळत नाही तो पर्यंत आम्हांला “बालिका दिवस”साजरा करायचा बिलकुल अधिकार नाही …नुसते दोन–पाच मेसेज इकडून तिकडे फेकले म्हणजे बालिका दिन साजरा होत नाही हे आपल्याला कधी कळनार
……..ठीक आहे आपल्याला बालिका दिन साजरा करायचा आहे ना …..चला आज पासून आपण एक प्रतिज्ञा घेऊ या …मी आज बालिका दिना निमित्त अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या कुठल्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या बहिणीचे मुलीचे .माताचे पूर्णपणे संरक्षण करेल त्यांच्यावर कोणताही अन्याय करणार नाही किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही अशी मी ईश्वराला साक्षी ठेऊन प्रतिज्ञा करतो …….करा आता बालिका दिन साजरा ……..
…..माता सरस्वतीच्या हातातील विना ज्ञानात रममान झाली होती …..सुनीता विल्येम अंतराळात भ्रमंतीत मग्न .होती …कल्पना चावला आम्हास आदर्श शिकवीत होती …..अरुनीमा सिन्हा कमरेपासून दोघी पाय नसताना माउंट एवरेस्ट शिखर सर करत होती …..रुपाली चव्हाण पहिली मेट्रो पायलट आम्हांला आदर्श देत होती ….सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत ओलीम्पीक मैदान गाजवत होती …आमची माय सिंधूताई सपकाळ समाज कार्यात मग्न होती … रेखा मिश्रा भरकटलेल्या मुलींना आधार देत होती …सानिया मिर्झा खेळात दंग होती इंदिरा! गांधी …प्रतिभाताई पाटीलचा आदर्श आमच्या डोळ्यापुढे चमकत होता ….कोणत्याही परीक्षेत अग्रगण्य असणाऱ्या माझ्या शाळेतील मुली आमच्या मनावर ठसा उमटवत होत्या …गायिका लता मंगेशकर …विश्वसुंदरी हेमामालिनी ..आय पी एस अधिकारी किरण बेदी ..आमच्या देशाची मान उंचावत होत्या …..माझे मस्तक नकळत पणे भारतीय मुली पुढे झुकत गेले ….अविरतपणे ……॥॥
लेक मायेचं गोंदन
लेक घराचं चांदन
लेक नसता घरात
सुनं वाटत अंगण ……..।
मायेचा हा निर्मळ झरा
कधी होत नाही कोरा
लेक मायेची सावली
घेती ह्रदयी गोतावळा सारा …..।
लेक ओल्याव्याचं नातं
नाही कधी विसरत
जड़ झाले अश्रू नयनी
कशी सांगू माझी गत ……।
विश्वातील समस्त मुलींना बहिणीना मातांना बालिका दिन व महिला मुक्ती दिन आणी क्रांतीज्योती ज्ञानज्योती माय सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
श्रीधर बच्छाव (पाटिल )
कवी /लेखक/समीक्षक
बालाजी नगर, सिल्लोड
जि .संभाजीनगर
मो .न .–8975657720
