शैक्षणिक
जयहिंद पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा गायकवाड तर आभार निर्मला शिंदे यांनी केले

जयहिंद पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
वाळूज महानगर प्रतिनिधी-राजू जंगले
रांजणगाव शेणपुंजी परीसरातील नुपूर शिक्षण संस्था संचलित जयहिंद पब्लिक स्कूल या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे सचिव चंद्रिका देशमुख, व्याख्याते अँड साई महाशब्दे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ संजय काळे, मुख्याध्यापिका नमिता मार्कंडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप गायकवाड, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक प्रकाश त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा गायकवाड तर आभार निर्मला शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
