
महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर,अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याम्साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी या पोर्टलद्वारे राबविली जाते. त्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज मुख्याध्यापकांनी ऑनलाईन भरुन घ्यावे व योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.
योजनेचा तपशिलः- इयत्ता ९ वी, १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांचाही समावेश, इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती.
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धतीः- अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्याध्यापकांकडे सादर करावे, संबंधित मुख्याध्यापकांनी आपल्याकडील अर्ज ऑनलाईन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगईनवर सादर करावे. संबंधित गटशिक्षण अधिकारी यांनी अर्जांची तपासणी करुन पात्र व परिपूर्ण अर्ज जिल्हास्तरावरील समाजकल्याणच्या लॉगईनवर सादर करावे.
शहरातील, महनगरपालिका क्षेत्रातील , अनुदानित, ग्रामिण भागातील जिल्हा परिषद, अनुदानित खाजगी शाळांनी सन २०४- २५ मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावे. कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची संबधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी , प्रशासन अधिकारी यांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.
