परभणी ते मुंबई निघालेल्या लॉंगमार्चला वैद्यकीय औषधी साठा भेट.
सामाजिक बांधिलकी जपत, वैद्यकीय किट, औषधीसाठा

परभणी ते मुंबई निघालेल्या लॉंगमार्चला वैद्यकीय औषधी साठा भेट.
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था
परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण, लोकनेते विजय वाकोडे यांचे निधन, पोलिसांनी केलेले बौद्ध वस्त्यांतील कोंबिंग ऑपरेशन व पोलिसांचा अमानुष अत्याचार, संतोष देशमुख हत्या प्रकरण आदी मागण्यांसाठी परभणी ते मंत्रालय मुंबई येथे निघालेला संविधान प्रेमी आंबेडकरी जनतेचा लॉन्ग मार्च आज छत्रपती संभाजीनगर बुद्धलेणी येथे दाखल झाला असता, अनेकांची तब्येत बिघडली होती. तसेच अनेक दिवसापासून पायी चालत असल्याने ज्येष्ठ नागरिक महिला, तरुण यांच्या पायाला फोड आले त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत, वैद्यकीय किट, औषधीसाठा, त्यामध्ये क्रप बँडेज, नीकॅप, झेंडूबाम, शुगर, बीपी, पेन किलर, पॅराशुटोमल, सिटरजिन गोळ्या, बीटाडीन ट्यूब, हँडवॉश, मास्क, ओआरएस एनर्जी पावडर, आयडीन किट, बँडेज, , इत्यादी औषधीसाठा लाँग मार्चचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांना देण्यात आला आहे,
यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे उपस्थित होते हा औषधीसाठा दिलीप गोदणे, गुल्लुभाऊ वाकेकर, आनंदभाऊ वाहुळ, मनीष नरवडे, पवन पवार, संदीप अहिरे, अक्षय ठोंबरे, नितेश तांगडे, यांच्या वतीने देण्यात आला आहे.
