ईतरराज्य

राज्यभरात दोन-तीन दिवस उकाडा वाढणार; घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

‎🥵 राज्यभरात दोन-तीन दिवस उकाडा वाढणार; घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था 

▪️ फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी सोलापूर येथे उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद झाली. सोमवारी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

▪️ राज्यात थंडी ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान 35 अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. महाराष्‍ट्रातील कोकण, गोवा, मध्‍य महाराष्‍ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्‍याचा अंदाज आहे. 

▪️ ठिकाणे तापमान कमाल तापमान किमान

– पुणे—३४.२—१६.४

– अहिल्यानगर—३३.८—१५.७

– धुळे—३१.८—११.८

– जळगाव—३२.२—१६.५

– कोल्हापूर—३२.८—१९.८

– नाशिक—३३.७—१६.४

– सांगली—३४.२—१८.८

– सातारा—३४—१७.५

– सोलापूर—३६—२२.

– रत्नागिरी—३५.४—२०.५

– छत्रपती संभाजीनगर—३३.५—१८.६

– धाराशिव—३३—१७

– परभणी—३४.७—१८.१

– अकोला—३५—१९

– अमरावती—३२.४—१६.१

– भंडारा—३१.६—१६.१

– बुलढाणा—३४—२०

– चंद्रपूर—३२.८—निरंक

– गडचिरोली—३३.२—१५.६

– गोंदिया—३०.६—१६.४

– नागपूर—३२.४—१५

– वर्धा—३२—१६.४

– वाशीम—३४.६—२०.८

– यवतमाळ—३३.६—१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा👉 www.saksharindialivenews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 साक्षर इंडिया लाईव्ह च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 8888962010       

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close