
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ गद्दारांचा सन्मान केलातच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या दिल्लीतील सत्कारावर संजय राऊतांचा सवाल, साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात
▪️ एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले, त्यांनी काश्मीर आणि पंजाबमध्येही महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजक संजय नहार यांनी स्पष्ट केली पुरस्कारामागची भूमिका
▪️ परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा दाखल
▪️ राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, उपनेतेपदाचा राजीनामा, लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
▪️ तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार अजूनही मागे घेण्यात आली नाही, आम्ही घटनाक्रम तपासतोय, पुण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
▪️ संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पळून जाणाऱ्या कराड गँगला पोलिसांनीच टीप दिली, धनंजय देशमुखांचा मोठा आरोप
▪️ छोटे कपडे घालून नाचणे गुन्हा नाही, पण त्यामुळे लोकांना त्रास होत असेल तर शिक्षा होऊ शकते; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
▪️ मुंबईत GBSने घेतला पहिला बळी, नायर रुग्णालयात उपचारादरम्यान 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
▪️ अभिनेता राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडीओत आतापर्यंत काही आक्षेपार्ह आढळलं नाही, अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण
▪️ जसप्रीत बुमराहसह यशस्वी जैस्वालही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला, तर जैस्वालच्या जागेवर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान
