शैक्षणिक

विद्यार्थी म्हणजे निरागस मनाची पाखरं – डॉ .मीरकर साहेब 

सूत्र संचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी वैष्णवी इंगळे व अणुजा सोनूने यांनी केले

विद्यार्थी म्हणजे निरागस मनाची पाखरं – डॉ .मीरकर 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

पूर्णा कावेरी शिक्षण संस्था सिल्लोड संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल या शाळेत शनिवार दिनांक १५–०२-२५ रोजी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्या कडून इयत्ता दहावी च्या विद्यार्थी मित्रांना निरोप देण्यात आला 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन …..डॉ .अर्जुन खोमने .डॉ .मिरकर साहेब .सोणवने साहेब . यांची उपस्थिति होती व्यासपिठावर संस्थेचे प्रमुख डॉ .आशीष पाटील .डॉ.सीमाताई पाटील .आ .अजिंक्य पाटील अरुणा सोनवने जगदीश कापुरे यांची व्यासपीठावर उपस्थिति होती 

विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना सुमन हॉस्पिटलचे संचालक  डॉ .मिरकर “म्हणाले की विद्यार्थी जीवन हे आनंदमय व निरागस असे जीवन असते म्हणुन विद्यार्थी मित्रांनी आपल्या विद्यार्थी जीवनाचा आनंद लूटत असतांना शालेय अभ्यासाकडे ही वेळोवेळी लक्ष केंद्रीत केले पाहिजे कारण तुमचे आताचे हे लहान रोपट्यासारखे आहे जसे वाकवले तसे वाकते म्हणुन एक विद्यार्थी म्हणुन तुम्ही स्वताला एक आचार संहिता घालून संस्कारक्षम बनले पाहिजे दहावी पास झाल्यावर तुम्ही विविध शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करणार आहात तेव्हा तुम्हांला तुमच्यावर शालेय जीवनात शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन संस्कार उपयोगी पडतील नेहमी गुरुजन आईवडील यांचा आदर सन्मान करा व तुम्हांला ज्या क्षेत्रात आवड असेल ते क्षेत्र निवडून त्याच्यात आपले भावविश्व निर्माण करा मी तुम्हांला दहावीच्या परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो असे प्रतिपादन डॉ .मिरकर यांनी केले

कार्यक्रमाला.. शुभम कचरे.प्रदीप शेळके .निती,न दांडगे .भूषण पिताबंरे .अमोल राऊत सोमिनाथ मोरे .किशोर आर्के .दीपक उचित .प्रदीप कूदळे.गणेश काटोले .विशाल भोसले .राजू शेख .दत्ता शिंदे अनिता रोडगे .गंगासागर मुटकुळे.राणी जगताप .अर्चना बोरडे .मंजू शिंदे दीपाली लक्कस .ज्योती इंगळे.पायल ठक्कर .सौ तळेकर ….सौ .काळे .. सौ .घोरपड़े .सौ तांगडे ..वणिता म्हस्के .निता आव्हाड इत्यादी कर्मचारी .उपस्थित होते 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी वैष्णवी इंगळे व अणुजा सोनूने यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close