राज्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…महागाई भत्यात वाढ…एवढ्या टक्क्यांचा फायदा..

माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…महागाई भत्यात वाढ…एवढ्या टक्क्यांचा फायदा..

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या मित्र-परिवारात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल तर लवकरच तुम्हाला आनंदवार्ता मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता दिली आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरुन ५३ टक्के करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close