संपादकीय

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - श्रीधर बच्छाव कवी /लेखक /समीक्षक

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ॥तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमच्या ने जिवना॥

॥॥ ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी 

   तुकोबांनी रचली गाथा 

सम्रुद्ध संप्पन झाली 

माझी मराठी भाषा ॥॥ 

             आज २७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जल्म दिवस आपण सम्पूर्ण भारतात मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करत असतो 

           मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.

॥मी मराठी माझी भाषा मराठी ॥

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

– श्रीधर बच्छाव

कवी /लेखक /समीक्षक

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close