विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी, ‘अशी’ करा नोंदणी
ठी अनुक्रमे 21000 रुपये, 9000 रुपये इतके देणगी मूल्य आहे.

💐विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी, ‘अशी’ करा नोंदणी
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
◼️ श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात दि. 25 मार्च रोजी सकाळी 11 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
◼️ भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 व दुसऱ्या टप्प्यात दि. 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील श्रीच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
◼️ श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25000, 11000 रुपये तसेच पाद्यपूजेसाठी 5000 व तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे 21000 रुपये, 9000 रुपये इतके देणगी मूल्य आहे.
