राजकिय
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी तिसगाव येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन.
तिसगाव च्या वतीने आठवले साहेब यांचा सामुहीक सत्कार सन्मान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी तिसगाव येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी राजू जंगले
सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आपला शिर्डी दौरा आटोपून मराठवाड्याच्या आढावा बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात येत असतांना सोलापूर -धुळे महामार्गांवर डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक तिसगाव येथे नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळ्याला आज सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी भेट देऊन अभिवादन केले यावेळी औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष सतीश महापुरे यांनी स्वागत केले यावेळी रमेशदादा दाभाडे, विजयभाऊ मगरे, अंजनभाऊ साळवे,सुखदेव भाऊ सोनवणे, राणोजी जाधव,
संजयभाऊ जाधव,अँड.नामदेव सावंत, लालचंद कसूरे ,सोमीनाथ महापुरे, सुगंधभाऊ दाभाडे, प्रकाश भाऊ निकम, किशोरभाऊ साळवे, नितीनभाऊ जाधव,सुगंध भाऊ दाभाडे, भीमरत्न कांबळे,
गौतमदादा मोरे, जितेंद्र दाभाडे, अरुण पठारे, ज्ञानेश्वरभाऊ जाधव
गौतमभाऊ बनसोडे, महेंद्रभाऊ जाधव,चेतनभाऊ सोनवणे,रोहित दाभाडे, प्रवीणभाऊ वाघमारे,नरेंद्र त्रिभुवन,भरत साळे, सूर्यकांत पठारे आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी संपूर्ण तिसगाव वाशियांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत तिसगाव च्या वतीने आठवले साहेब यांचा सामुहीक सत्कार सन्मान करण्यात आला.
