शैक्षणिक
१५ एप्रिल पासून विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी मोहीम
२५ % प्रवेश प्रक्रिया, वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.

१५ एप्रिल पासून विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी मोहीम
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर
सर्व शाळांमधील एकूण ९४.७२ % विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित झाले आहेत. आता उर्वरित ५ % विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी १५ एप्रिलपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ९३ % विद्यार्थ्यांचे आधारचे काम झाले असून, प्रत्येक ठिकाणी अधिकारी नेमून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ % प्रवेश प्रक्रिया, वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.
