शैक्षणिक

हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन 

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज

बजाजनगर स्थित हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयात ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीच्या माध्यामातुन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉरमेशन टेक्रोलॉजी / मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या शाखेतील अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन दि. १२/०४/२०२५ रोजी करण्यात आले. या प्लेसमेंट ड्राइव्हकरिता हायटेक अभियांत्रिकी महाविदयालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयातील अंतिम वर्षाच्या एकुण ७८ विदयार्थ्यांनी प्रतिसाद नोंदविला.

सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव  एकनाथ जाधव व संस्थेचे सहसचिव  अमन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत इंजि. कृष्णा दिवेदी आणि इंजि. वाया अमोघ हे अधिकारी उपस्थित होते.

तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षोंचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, सीएसईएआयएमएल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. संदिप ई. इंगळे, ट्रेनिग अँड प्लेसमेंटस विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी व्ही.व्ही . जाधव, आणि सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close