मारसावळी श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठांनाकडे वाढली अन्नदात्यांची रीघ….
पंगत घेण्यासाठी तब्बल एवढे दिवस लागतात....

मारसावळी श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठांनाकडे वाढली अन्नदात्यांची रीघ….
पंगत घेण्यासाठी तब्बल एवढे दिवस लागतात….
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी नारायण महाराज बांबर्डे छत्रपती संभाजीनगर
शिवभक्त गुणाजी महाराज गाडेकर बाबा भक्तिच्या मार्गाने लोकांच्या दुःखाचे निवारण करतात वेळोवेळी मार्गदर्शन करतात.. यातून लोकांचे कोणतेही प्रश्न असतील ते मार्गी लागतात व्यसनापासून लोक तरुण पिढी दूर होते व भक्ती मार्गाला लागते यामुळेच या प्रतिष्ठानकडे भक्ताची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येण्याची रीघ दिवसेंदिवस वाढत आहे लोकांचे दुःखाचे निवारण होत असून लोक बाबाकडे येतांना रडत दुःख घेऊन येतात मात्र जातांनी बाबाच्या अनमोल मार्गदर्शनाने चेहऱ्यावर हास्य घेऊन जातात त्यांचे समाधान होते त्याचीच पावती म्हणून लोक दानधर्म व गुरुच्या सानिध्यात राहून गुरूच्या भक्तीत ईश्वर प्राप्ती साठी लोक भक्तीत लीन झालेले आपल्याला या पवित्र डोंगरकाठी वसलेल्या मारसावळी येथील गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान ची महती आपल्याला पहायला मिळते.
या ठिकाणी प्रत्येक सोमवारी ,अमावस्या, पौर्णिमेला बाबा लोकांच्या समस्याचे निराकरण करतात व प्रसाद घेतल्याशिवाय बाबा भक्ताना वापस पाठवत नाही हा बाबाचा नियम आपल्याला अनुभवायला मिळतो सोबतच या ठिकाणी आपल्याला शिस्त बघायला अनुभवायला मिळते.
अन्नदाते म्हणून आपल्याला नोंदणी केल्यावर सहा महिन्याने आपला नंबर येतो एवढे दिवस पंगतीचे बुक झालेले आहेत.
