क्राइम

एस क्लब सिग्नल आज या ठिकाणी रिक्षा चालकांवर कारवाई 

उपनिरीक्षक विठ्ठल घोडके तसेच कर्मचारी आदींच्या निगराणीत कारवाई सुरू आहे

एस क्लब सिग्नल आज या ठिकाणी रिक्षा चालकांवर कारवाई 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज 

उपनिरीक्षक विठ्ठल घोडके तसेच कर्मचारी आदींच्या निगराणीत कारवाई सुरू आहे

नेकमी कारवाई का…?

दोन दिवसांपूर्वी शहरात घडलेल्या भावी शिक्षकाच्या निघृण हत्येप्रकरणी सर्वत्र खळबळ उडाली असून, या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षा चालकांविरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी परिसरात वाहतूक शाखेने बुधवारी (दि.११) रात्री १० ते १२ दरम्यान ओअॅसिस चौकात अचानक नाकाबंदी करत मोठी तपासणी मोहीम राबवली.

या मोहीमेत एकूण ५१ वाहनांची तपासणी

करण्यात आली. २५ रिक्षांवर थेट कारवाई करत ३२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर प्रलंबित ५ हजार, २०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे ४ ऑटोरिक्षा थेट ताब्यात घेण्यात आल्या.

ही मोहीम पोलीस निरीक्षक सचिन इंगोले व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली. संपूर्ण तपासणीदरम्यान वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close