काशी विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावण सोमवारी भक्तांचा महासागर; सजावट, रक्तदान आणि महाप्रसादाने भक्तिभावात भर
श्रावण सोमवार भक्तिभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला.

भालगाव येथील काशी विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावण सोमवारी भक्तांचा महासागर; सजावट, रक्तदान आणि महाप्रसादाने भक्तिभावात भर
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:ज्ञानेश्वर तांबे
भालगाव येथील प्राचीन श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. महादेवाच्या जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला होता.
या विशेष दिवशी मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटवण्यात आला होता. भक्तांनी अभिषेक, पूजा व महाआरतीमध्ये मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
या वेळी दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविक व युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक भान जपले.
मंदिर विश्वास समितीच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांनी एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेतला आणि श्रावणसोमवारी महादेवाची कृपा मिळवली.
या धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे ग्रामस्थ, मंदिर समिती, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकंदरीत, भालगावच्या काशी विश्वनाथ मंदिरात यंदाचा श्रावण सोमवार भक्तिभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला.
