आधार कार्ड अपडेट आता मोबाईल वर अपडेट करता येणार नवीन अँप लाँच
जन्माचा दाखला, पॅनकार्ड, पारपत्र आणि अगदी मनरेगाचं प्रमाणपत्रही इथून पुढे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

Aadhar Card Update आता मोबाईलवर
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

New Aadhaar App ; आधार कार्डावरील पत्ता, फोन नंबर किंवा इतर कुठलीही माहिती बदलायची असेल तर(New Aadhaar App)सध्या आधार केंद्रांवर जाऊन हे बदल करून घ्यावे लागतात. आता ही सोय पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे

युआयडीएआय या आधार कार्ड निर्मिती करणाऱ्या संस्थेनं तयार केलेलं हे ॲप आता लाँच करण्यात आलं आहे. या ॲपमध्ये आधार कार्डघारकाचा चेहरा स्कॅन होईल. त्यामुळे हे ॲप तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आधार कार्डाचं कागदी ओळखपत्र बाळगण्याची गरज नाही. मोबाईल ॲपमध्ये असलेलं ओळखपत्रच हे काम करेल. अँड्रॉईड तसंच आयओएस प्रणालीच्या फोनमध्ये हे ॲप डाऊनलोड करता येईल.(New Aadhaar App)

ई-आधार मोबाईल ॲप हे आधार धारकांच्या सोयीसाठी असेल. आणि यात आधार कार्डात करायचे कुठलेही वैध बदल हे आधार सेवा केंद्रांमध्ये न जाता, घरच्या घरी एका क्लिकवर होऊ शकतील. मोबाईल क्रमांक बदलण्याचं काम ऑनलाईन होतं. पण, पत्ता किंवा इतर वैयक्तिक माहिती बदलायची असेल तर त्यासाठी आधार सेवा केंद्रांमध्ये जावं लागतं. ही फरफट आता थांबणार आहे.
अशा प्रकारचं ॲप बनवणं ही खरंतर क्लिष्ट गोष्ट आहे. कारण, आधार कार्ड हे ओळखपत्र आहे. आणि यात आधार कार्डधारकाची ओळख पटवण्यासाठी बोटाचे ठसे, फेस आयडी, डोळ्यांच्या बुबुळाचे रंग अशा निकषांचा वापर होतो. हे तंत्रज्जान आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे विकसित केलं आहे. खास करून फेस आयडी तंत्रज्जानाचा वापर ऑनलाईन आधार तयार करण्यासाठी होणार आहे. बायोमेट्रिक पडताळणी आणि डोळ्यांच्या बुबुळांच्या सुरुवातीच्या मॅपिंगसाठी मात्र आधार केंद्रांवरच जावं लागेल.

आधी ठरवल्याप्रमाणे काही महिन्यांच्या चाचण्यांनंतर हे ॲप लोकांसाठी खुलं करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जन्माचा दाखला, पॅनकार्ड, पारपत्र आणि अगदी मनरेगाचं प्रमाणपत्रही इथून पुढे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.





