बिझनेसराज्य

HSRP साठी पुन्हा मुदतवाढ; महाराष्ट्रात हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यास चुकलेल्यांसाठी आनंदाची बातमी

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

HSRP साठी पुन्हा मुदतवाढ

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

महाराष्ट्रात हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यास चुकलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाहतूक विभागाने हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
हि पाचवी मुदतवाढ आहे..उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार केलेल्या वाहनांवर सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारीपासून या नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. यामुळे अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये सहभागी वाहने ओळखणे सोपे होईल आणि सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. सर्व वाहनांसाठी सुरक्षा नंबर प्लेट अनिवार्य केल्या जात आहेत.

  असा दावाही केला जात आहे की, या नंबर प्लेटमुळे विविध गुन्ह्यांमध्ये आणि अपघातांमध्ये सहभागी असलेल्या वाहनांची सहज ओळख पटण्यास मदत होईल.
  एकट्या पुण्यात सुमारे 1,50,000 वाहनांमध्ये अजूनही सुरक्षा नंबर प्लेट्स नाहीत. वाहतूक विभागाने अनेक वेळा मुदतवाढ देऊनही त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिलेले नाही. पुण्यातील 65% वाहनांवर अजूनही नंबर प्लेट नाहीत. सध्या सुरक्षा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांसाठी आरटीओमध्ये कोणतेही काम केले जात नाही. 31 डिसेंबरनंतर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना दंड आकारला जाईल, त्यामुळे त्या त्वरित बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   संपूर्ण महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांची संख्या सुमारे 2.10 कोटी आहे. त्यापैकी 90 लाख वाहनांना हाय-सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 73 लाख वाहनांना हाय-सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र राज्यातील मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी बसवलेली नसल्यामुळे मुदतवाढीची मागणी सातत्याने होत होती. नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून परिवहन विभागाने अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

31 डिसेंबरनंतर कठोर कारवाई

परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुदतवाढ अंतिम असून 31 डिसेंबरनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कडक कारवाई केली जाईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close