शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिकादिन ) निमित्त अभिवादन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देसले एम. ए. यांनी आपल्या सुंदर शैलीत केले. तर आभार सौ देसले यु.जे. यांनी मानले.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिकादिन ) निमित्त अभिवादन

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क छ्त्रपती संभाजी नगर 

आज दि. 3 डिसेंबर 2025 रोजी पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजाराम सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे संस्थापक आदरणीय प्रा. ओमप्रकाशजी शिंदे सर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मुख्याध्यापक मा. श्री. महेंद्र ढाके हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मा. श्रीमती कुलकर्णी व्ही.व्ही. व श्री घोरपडे डी. आर.हे होते. 

            सुरुवातीला दोन विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करणारं गीत सादर केले. त्यानंतर चार-पाच मुलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या बद्दल माहिती सांगितली. 

             कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मा. श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी विविध उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिली.  

          त्यानंतर मुख्याध्यापक मा. श्री महेंद्र ढाके. यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा केवळ शैक्षणिक दृष्टिकोनच मांडला नाही तर सामाजिक दृष्टिकोन सुद्धा मांडला . विद्यार्थ्यांनी यानिमित्त त्यांचे विचार आचरणात आणावे आणि त्यांचे साहित्याचे वाचन करावे ही अपेक्षा व्यक्त केली.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देसले एम. ए. यांनी आपल्या सुंदर शैलीत केले. तर आभार सौ देसले यु.जे. यांनी मानले.

         फलक लेखन श्री घुसिंगे सरांनी सुंदर केले.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close