
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे, या संदर्भात आढावा बैठक संपन्न..
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारानिमित्त शनिवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी एन-६, बजरंग चौक येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे..
मतदारांशी थेट संवाद साधून महायुतीची धोरणे, येत्या काळातील विकास कामे व स्थानिक मुद्द्यांवरील राज्य सरकारची सकारात्मक भूमिका या निमित्ताने नागरिकांसमोर स्पष्ट होईल..
तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बांधवांनी लाखोंच्या संख्येने या सभेला उपस्थित रहावे अशी विनंती औरंगाबाद पूर्वचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांनी केली आहे.
