
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️वाल्मिक कराड असलेल्या बीडच्या जेलमध्ये राडा, बबन गिते समर्थकांची कारागृहातच हाणामारी; कराडला मारहाण झाल्याचा आमदार सुरेश धस यांचा दावा
▪️मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी उभे केलेल्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला, जागेवरच पोस्टमॉर्टम आणि अत्यंविधी; हत्या झाल्याची चर्चा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा
▪️तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला कथित मारहाण करणाऱ्या महादेव गितेसाठी बबन गितेने FB पोस्ट केल्याची चर्चा
▪️मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय
▪️गेल्या १० वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कुणाल कामराने एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.
▪️EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी, आता एक लाख नव्हे तर पाच लाखांपर्यंत ऑटो सेटलमेंट
▪️ पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
▪️अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव, केकेआरवर मोठा विजय; अश्वनी कुमार चमकला
▪️तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
