सामाजिक

सिडको वाळुजमहानगर मधील संत मीरा आदर्श महिला मंडळाकडुन सप्ताह शिवकथा पारायण

भाविकांनी कीर्तन तसेच शिवपुराण नमस्कार श्रवण करावे असे अहवान मंडळाकडुन करण्यात आले.

सिडको वाळुजमहानगर मधील संत मीरा आदर्श महिला मंडळाकडुन सप्ताह शिवकथा पारायण

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज वाळूज प्रतिनिधी राजू जंगले 

     वाळूज महानगर:आज दरवर्षी प्रमाणे सिडको वाळूजमहानगर-१ मधील संत मीरा आदर्श महिला मंडळ व सर्व सिडको वाळूजमहानगर येथील रहिवाशी यांच्या वतिने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण,शिवकथा सोहळा आदर्श बाल उद्यान ग्राऊंड वर सुरू होतो या सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ व ध्वजारोहण मा.उपसरपंच विष्णुभाऊ जाधव,मा.उपसरपंच नागेश कुठारे,ह.भ.प.बबन चौरे महाराज यांच्या हस्ते पार पाडला.

या वेळी महिला मंडळाच्या अलका शेंगुळे, उर्मिला देशपांडे, मनिषा पवार, संगिता पाले, मंदा भोसले, ज्योती पाटील, विजया चव्हाण, प्रतिभा दिक्षित, आशा जाधव,छाया पाटिल, संगिता देवकर, शोभा मानके, लीलाबाई देवकर , सुनिता खांडरे, पदाधिकारी,श्री.सुदाम शेंगुळे,श्री.भास्कर पाले साहेब,श्री.विष्णुदास पाटील,श्री.बाबासाहेब साळुंके,सौ.गोदावरी कोल्हेताई ग्रामपंचायत सदस्य तिसगाव,प्रमोद मोगले व ईतर सिडको वाळूजमहानगर मधील भक्त गण उपस्थित होते तरी परिसरातील सर्व भाविक भक्तानी या सप्ताहात सहभागी होऊन कीर्तन तसेच शिवपुराण नमस्कार श्रवण करावे असे अहवान मंडळाकडुन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close