
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी
▪️ राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
▪️ तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं, 20 दिवसापूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षीच आत्महत्या
▪️ सुरेश धस म्हणजे आधुनिक भगीरथ, बीडच्या आष्टीतील विकासकामादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, मंत्री पंकजा मुंडे,सुरेश धस, बजरंग बाप्पा, प्रकाश सोळंकेंसह दिग्गज एकाच मंचावर
▪️ वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
▪️ विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाच छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू
▪️ दिशा सालियान प्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
▪️ ‘देशभरात मांसाहारी अन्नावर बंदी घालावी’, UCC चे समर्थन करत खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली मोठी मागणी
▪️ पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
▪️ दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान, अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद, 8 फेब्रुवारीला मतमोजणी
▪️ दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी वाढदिवसदिनी केली हेरा फेरी 3 ची अधिकृत घोषणा, तिसऱ्या भागात अभिनेत्री तब्बूही दिसणार
