
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा जिल्हादौरा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे शनिवार दि.२२ रोजी सपत्निक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२२ रोजी दुपारी दीड वा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन.
दुपारी एक वा. ४० मि. नी. हेलिकॉप्टरने वेरुळकडे प्रयाण.
दुपारी २ वा. वेरुळ येथे हेलिपॅडवर आगमन,
दुपारी २ ते सव्वा दोन दरम्यान घृष्णेश्वर मंदिर येथे पूजा व दर्शन, तेथून वेरुळ लेणी येथे आगमन व कैलास लेणी पाहणी, पावणे तीन वा. वेरुळ हेलिपॅड येथे मोटारीने आगमन व हेलिकॉप्टरने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
दुपारी ३ वा. १० मि.नी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन, दुपारी ३ वा. २० मि. नी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजीत ६५ व्या पदवीदान समारंभास उपस्थिती.
दुपारी साडेचार वा.एस.बी.कॉलेजकडे प्रयाण, दुपारी ४ वा. ४० मि. नी. एस.बी. कॉलेज येथे संविधान जागृती व अमृत महोत्सव उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.सायं. ५ वा. २५ मि. नी.३९१,टॉडलर स्कुलच्या बाजुला एन ३ सिडको कडे प्रयाण व राखीव. सायं.५ वा. ५० मि. नी. विमानतळाकडे प्रयाण. व सायं. सहा वा. शासकीय विमानाने दिल्लीकडे प्रयाण होईल.
