पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
संत महंत यांच्यासह गावातील सर्व धर्मीय नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते....!

पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क प्रतिनिधी नारायण बांबर्डे महाराज
पिंपरी तालुका फुलंब्री येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व मराठी नववर्षानिमित्त हा भव्य दिव्य 14 फुटी पुतळा फुलंब्री येथून वाजत गाजत भव्य रॅली सह पाथरी आळंद सताळा या गावातून रॅली काढण्यात आली व ठीक ठिकाणी स्वागत सर्वधर्मीय नागरिकांकडून करण्यात आले महाराजांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून नागरिक पिंपरी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले. गोरज मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
ग्रामदैवत आई अंबा भवानी यात्रा महोत्सवानिमित्त पंचक्रोशीत दस अवतारी सोगाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. शेकडो लोक सोंग पाहण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी ह भ प मठापती भरत गिरीजी महाराज बोरगाव अर्ज, ह भ प मठापती कृष्णा गिरीजी महाराज कायगाव,
ह भ प मठापती भरत गिरीजी महाराज धामणगाव, ह भ प मठापती अवधेशानंद गिरीजी महाराज वाडी,
सरपंच कविताताई एरंडोले, मा. सरपंच पंढरीनाथ देवरे, पोलीस पाटील पांडुरंग पवार, ए पी आय श्री सुनील इंगळे साहेब, ह भ प नारायण महाराज बांबर्डे, रामदास बांबर्डे, कैलास बांबर्डे, शामराव देवरे, नारायण देवरे, आप्पा देवरे, रामेश्वर पवार, जगन महाराज पवार, कृष्णा पवार, दगडू नाना पवार, त्रिंबक जंजाळ, कौतिक जंजाळ, वसंत जंजाळ, बाबासाहेब तायडे, शालिक जाधव, कृष्णा जाधव, शंकर पवार, भिका मिस्तरी, रावसाहेब कानडे, नरेश काळे, गडवे, सोनवणे व संत महंत यांच्यासह गावातील सर्व धर्मीय नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते….!
