आडगाव खुर्द येथे दत्त जयंती सोहळा
भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आडगाव खुर्द ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे.

आडगाव खुर्द येथे दत्त जयंती सोहळा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क प्रतिनिधी: नारायणबांबर्डे(महाराज)
छत्रपती संभाजीनगर: आडगाव खुर्द येथे जयंतीनिमित्त दत्त वेरूळ येथील नाथ आश्रमाच्या हभप प.पू सदगुरू अक्का महाराज यांच्या प्रेरणेने ११ ते १५ डिसेंबरच्या दरम्यान फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र पारायण, दत्तयाग, गीता जयंती सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्याचे ध्वजारोहण, अभिषेक व पूजन ४ डिसेंबर रोजी होणार आहे. दररोज प.पू. स्वामी विनायक महाराज यांच्या अमृतवाणीतून गीता पारायण, सद्गुरू सुभाषबाबा महाराज यांचे प्रवचन होईल.
या सप्ताहात वाल्मिक महाराज आवारे, विजय महाराज जाधव, हभप बबन महाराज केदारे, पांडुरंग महाराज उगले, उमेश महाराज दशरथे, शिवाजी महाराज बोकारे, स्वामी अरुणनाथगिरी महाराज आदी मान्यवरांचेही विविध कार्यक्रम होणार आहेत.
काल्याचा महाप्रसाद खा. संदीपान भुमरे यांच्यातर्फे देण्यात येईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आडगाव खुर्द ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे.
