बजाजनगर परिसरात जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा गौरव
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता वाकडे यांनी तर आभार कृष्णा गुंड यांनी केले.

बजाजनगर परिसरात जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा गौरव
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वाळूज महानगर प्रतिनिधी राजू जंगले
वाळूज महानगर परीसरातील दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने परीसरातील सामाजिक, शैक्षणिक साहित्य कला , प्रशासकीय अधिकारी, आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नारी शक्तीचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, मंजुषा कर्पे, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा उद्योगपती कैलास भोकरे पाटील, पारसचंद साकला आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमा प्रसंगी वाळूज महानगर परीसरातील दिव्यांग महिलांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विष्णूदास पाटील, प्रा. विद्या उगले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे संतोष उगले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल पाटील,
प्रदीप माळी, अण्णा कांडेकर, कैलास चव्हाण, डॉ. संकपाळ, जनार्दन नवसरे, जनार्दन निकम,
पवळे, शिवाजी राऊत, यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता वाकडे यांनी तर आभार कृष्णा गुंड यांनी केले.
