ईतर

ग्राम सभा ठराव प्रस्ताव मंजुरीसाठी पालकमंत्री व पंचायतसमितीकडे पाठविण्यात येणार

भगवान रायकर आदी व वस्तीतील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

तिसगावातिल गट नं. २२७/१  मधिल वस्ती कायम करण्या संदर्भातिल ग्राम सभा ठराव प्रस्ताव मंजुरीसाठी पालकमंत्री व पंचायतसमितीकडे पाठविण्यात येणार

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज

सविस्तर, दि. २५/२/२०२५ रोजी वस्ती नियमाकुल ठरावाची मुळ प्रत ग्रामपंचायत कार्यालया कडुन सुनिल जोगदंड व शशिकांत गोफणे यांना ग्रामसेवक  श्री. हरिश आधंळे साहेबानी दिली. व त्या वेळी श्री. संजयजी जाधव व श्री. लालचंद कसुरे यांनी आम्ही हा ठराव पालकमंत्री व पंचायतसमिती कडे मंजुरी साठी पाठवनार आसे सांगितले. नियमाकुल ठराव सर्वानुमते मंजुर केल्या बद्दल सर्व नागरिकांनी आनंदी होऊन ग्रामपंचायत आधिकारी, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्याचे आभार मानले.

दि. ७/०२/२०२५ शुक्रवार रोजी ग्रामपंचायत तिसगाव  येथे ग्रामसभा सरपंच श्रीमती. शकुंतलाताई लालचंद कसुरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली  होती या वेळी मा. रमाई जयंती सार्वजनिक रित्या साजरी करुन ग्राम सभा सुरवात करन्यात आली होती.

ग्रामसभेत गोरगरीबांच्या निवार्याचा म्हनजे मा. रमाई व लो. अण्णाभाऊ साठे नगर गट न. २२७/१ शासकिय गायरान येथिल वस्ती  कायम करण्या संदर्भात विषय घ्यावा करिता तसा अर्ज शशिकांत गोफणे व सुनिल जोगदंड यांनी दोन दिवस आधी म्हणजे  ०५ /०२/२०२५ रोजी येथिल नागरिकाच्या सही निशी व शशिकांत गोफणे , सुनिल जोगदंड व ईतर यांच्या प्रयत्नातुन मिळालेले कार्यालय पंचायत  समिती छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयास तिसगाव यांना दिले होते.

मा. रमाई आबेंडकर नगर  व लो. अण्णाभाऊ साठे नगर या वस्तीचा मुद्दा माडंत ग्रामपंचायत सदस्य श्री संजयजी जाधव यांनी वरिल वस्ती नियमाकुल करण्यासाठी ग्रामसभा अध्यक्ष व सचिव यांना सुचवले.

तसेच राजेश भैया कसुरे यांनी वस्ति नियमाकुल करन्यासाठी पालकमंत्री यांना आमंत्रीत करुन  वस्ती नियमाकुल करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करुया आसे सुचवत नियमाकुल ठरावास पाठिबा दिला होता.

ग्रामसभे साठी ग्रामपंचायत सदस्य श्री ईश्वरशिंग तरैयावाले, श्री नितिन जाधव, तंटा मुक्ती ऊपाध्यक्ष श्री सोमनाथ महापुरे,  श्री सतिष महापुरे, श्री किशोर साळवे , शे आस्लम भाई , रॉबिनसन कसबे, आण्णा जाधव, आनिल आगळे, राजु जंगंले, बाबासाहेब रायकर, भगवान रायकर आदी व वस्तीतील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close