राज्यशैक्षणिक

शिक्षणाधिकारी लाठकर यांना पुरस्कार

सूत्रसंचालन अतुल घडमोडे यांनी; तर गणेश भूमी यांनी आभार मानले.

शिक्षणाधिकारी लाठकर यांना पुरस्कार

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी: गोरख जैस्वाल छत्रपती संभाजीनगर

‍छत्रपती संभाजीनगर : शिक्षणाधिकारी लाठकर यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : पहाट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना प्रदान करण्यात आला.

या समारंभास पहाट फाउंडेशनचे अमोल भिलंगे, सोमीनाथ चौधरी, तसेच प्रमुख अतिथी, प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक डॉ. प्राध्यापक संजय गायकवाड, प्रा. डॉ. विवेक पानसरे उपस्थित होते. सत्कारप्रसंगी मान्यवरांनी श्रीमती लाठकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. डॉ. गायकवाड यांनी स्त्रीशक्तीच्या योगदानाचे कौतुक करत, आजच्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्रांत स्वतःचे स्थान निर्माण केल्याचे अधोरेखित केले. डॉ. विवेक पानसरे यांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना अश्विनी लाठकर यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील संघर्षमय प्रवास उलगडला. ‘एका कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे कुटुंबाचा मोठा आधार असतो,’ असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अमोल भिलंगे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल घडमोडे यांनी; तर गणेश भूमी यांनी आभार मानले. यासाठी सुनील आदिक, श्रीपाद मुळे यांनी परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close