डॉ.भरतसिंग सलामपुरे राष्ट्रीय क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
मान्यवरांकडून सलामपुरे यांचे स्वागत होत आहे

डॉ.भरतसिंग सलामपुरे राष्ट्रीय क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी: राजू जंगले वाळूज
बजाजनगर येथे १४ वे झेप साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले होते, या ठिकाणी संकल्प शिक्षण संस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे तसेच स्वागत अध्यक्ष वेंकटेश मैलापुरे हे होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉ.भरतसिंग सलामपूर यांना क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, वडगावचे सरपंच सुनील काळे अध्यक्षस्थानी उपस्थित होते डॉ. सलामपुरे यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत व त्यांनी दगडोजीराव देशमुख कला व वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मध्ये शारीरिक शिक्षण विभागांमध्ये विभाग प्रमुख असून त्यांनी दोन पीएच.डी पदवी मिळवले आहेत, दोन ग्रंथ त्यांचे प्रकाशन झाले आहेत व आर्यन पोलीस भरती अकॅडमी ते संचालक आहेत, विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. तसेच त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ती पेपर पब्लिश आहेत, डॉ. सलामपुरे हे काय तायक्वांडो खेळाचे ब्लॅक बेल्ट, व राष्ट्रीय पंच देखील आहेत. सलामपूर यांची राज्य व राष्ट्रीय स्तरावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे, या पुरस्काराबद्दल तिसगाव चे माजी सरपंच मिठूलाल तरैयावाले, मोहनसिंग सलामपुरे , बिरजूलाल तरैयावाले, दीपक भेरें, प्राचार्य डॉ. राहुल हजारे, डॉ.दिलीप अर्जुने (शैक्षिक महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष) नवनाथ दळे, मोहन गीते, अण्णासाहेब गफट, बेडगे असे अनेक मान्यवरांकडून सलामपुरे यांचे स्वागत होत आहे
